शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा संकुल लवकरच सुरू--चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:18 IST

कोल्हापूर : शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार असून, त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत.

कोल्हापूर : शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडा प्रकारांची क्रीडांगणे तयार असून, त्यांच्या वापरासाठी विविध क्रीडा संस्थांशी समन्वय साधून ती खेळाडूंना वापरण्यास द्यावीत. त्यामुळे तेथे खेळाडूंचा वावर वाढून क्रीडांगणांचा वापर सुरू होईल. या निमित्ताने खेळाडूंसाठी विभागीय क्रीडा संकुलाच्या रूपाने अद्ययावत क्रीडा संकुल लवकरच सुरू होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्यास अनेक गुणवंत खेळाडू उदयास येतील व ते राष्टÑीय, आंतरराष्टÑीय स्तरावर गौरवशाली कामगिरी करतील. कोल्हापूर येथे उभारण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज व जलतरण तलाव वगळता सर्व क्रीडांगणांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यांचा वापर होणे आवश्यक असून, त्यासाठी क्रीडा संस्थांमार्फत या क्रीडांगणांचा वापर खेळाडूंसाठी व्हावा. जसजशी या ठिकाणी खेळाडूंची संख्या वाढेल, तसे काही त्रुटी समोर आल्यास त्या दूर करणे सोईचे होईल.चंद्रकांत दळवी म्हणाले, १० मीटर शूटिंग रेंज लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासाठी शूटिंग साहित्य खरेदीबाबत नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीतील तेजस्वीन सावंत, राही सरनोबत, युवराज साळुंखे, अजित पाटील यांच्यामध्ये एकमत करून त्यानुसार साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला जाईल. साहित्य एकल पद्धतीने खरेदी होणार असल्याने तो प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल.

यासाठी पुढच्या आठ दिवसांत विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तज्ञ समितीची बैठक घेण्यात येईल.दळवी यांनी मुख्य प्रवेशद्वार व स्वच्छता गृह, कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्ती, पहिल्या टप्प्यातील निविदेतील अपूर्ण कामे आदींचा सविस्तर आढावा घेऊन ही सर्व कामे १ डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीत डॉ. कुणाल खेमनार यांनी शिंगणापूर येथील राजर्षी शाहू क्रीडा प्रशालेसाठी आवश्यक असणाºया मल्टीपर्पज हॉलसाठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, आदी उपस्थित होते.पाण्याबाबत तज्ज्ञांचे मत घ्यावेकोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) या संस्थेने जलतरण तलावातील पाण्याचा निचरा करून तज्ज्ञांकडून मत घ्यावे व हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून सादर करावा. त्यावर शासकीय समितीने त्यांचा निर्णय घ्यावा व त्यानंतरच जलतरण तलावाचे पुढील काम करावे. खेळाडूंसाठी अडथळा ठरत असल्यास रनिंग ट्रॅकवर फिरण्यास बंदी घालावी. महानगरपालिकेने दुधाळी शूटिंग रेंजचा प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.२५ व ५० मीटर शूटिंग रेंजसाठी पायाभूत सुविधा तयारविभागीय क्रीडा संकुलातील २५ व ५० मीटर शूटिंग रेंजच्याही सर्व पायाभूत सुविधा तयार असून, या रेंजचाही वापर होऊ शकतो. तशी मागणीही आहे. त्यामुळे या शूटिंग रेंजसाठीही साहित्य खरेदीचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील, असे दळवी यांनी सांगितले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर